ऑनलाईन प्रॉपर्टी खरेदी करतायंत? या गोष्टी लक्षात ठेवा!

काही वर्षांपूर्वी आपल्याला जर एखादी वस्तू विकत घ्याची असल्यास आपण त्यासाठी संपूर्ण मार्केट फिरायचो. त्या वस्तूची योग्य किंमत काढायचो. त्यानंतर ती वस्तू खरेदी करायचो. पण कालांतराने ती प्रथा मोडली. कारण ऑनलाईन मार्केटचा ट्रेंड सुरु झाला.

लोकांना सर्व गोष्टी सोयीस्कर झाल्या. मग ते पैश्यांच्या बाबतीत असो वा वेळेच्या बाबतीत दोन्ही वाचू लागले. इंटरनेटमुळे लोकांना अधिक माहिती मिळू लागली.  आणि लोकांना घरबसल्या ऑनलाईन खरेदी उपयोगी ठरली.

हीच ऑनलाईन पद्धत रिअल इस्टेटमध्ये सुद्धा वापरली जाऊ लागली.  वेबसाईटवरील प्रॉपर्टीबद्दलची सर्व माहिती ग्राहकांना मिळत होती. पण ग्राहक साईट व्हिजिट करणे योग्य समजत होते. पण इथे ही वेळेनुसार अनेक बदल होऊ लागले. त्यात कोरोना व्हायरसच्या या परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत अनेक लोकांनी गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटचा मार्ग निवडला.

त्या ग्राहकांसाठी रिअल इस्टेटमध्ये ऑनलाईन खरेदीचे आणि साईट व्हिजिटचे अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले. लाखोंचे व्यवहार सुद्धा सोपे करण्यात आले. तुम्ही घरबसल्या तुमचे नवीन घर बघू शकाल अशी प्रणाली तयार करण्यात आली. पण ती ऑनलाईन प्रॉपर्टी खरेदी करताना काही गोष्टी करणे आवश्यक असतात. जर तुम्ही ही ऑनलाईन प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवूनच तुमच्या खरेदीचा निर्णय घ्या.

एकदा तरी साइटला भेट द्या

 डिजिटल टूर ही आपल्याला मालमत्तेबद्दल संपूर्ण कल्पना देते. आजच्या युगात तंत्रज्ञान अशा पातळीवर पोहोचले आहे जेथे खरेदीदारास डिजिटल टूरद्वारे आपल्याला त्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात अप्रत्यक्षरित्या आपण तिथे उपस्थित असल्यासारखे वाटू शकते. पण खरेदीदाराने अंतिम कॉल घेण्यापूर्वी किमान एकदाच त्या साईटवर जाऊन भेट दिली पाहिजे, कारण डिजिटल टूर अनेक गोष्टी कव्हर करू शकत नाही.

नामांकित ब्रँडची निवड करा

खरेदीची फसवणूक दूर ठेवण्यासाठी केवळ स्थापित कंपन्यांसह व स्थापित ब्रँडसह जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  एक गोष्ट नेहमी मानून चालावी की  इथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन व्यवहार असो रिअल इस्टेट क्षेत्रात फसवणूक आणि घोटाळेबाजी सामान्य झाली आहे.  खरेदीदारांनी कष्टाने कमावलेल्या पैसा लुटण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात.

 खासकरुन जर हा व्यवहार ऑनलाइन केला जात असेल तर. म्हणूनच, खरेदीदाराने अज्ञात स्त्रोतांच्या आकर्षक सौद्यांपासून सावध असले पाहिजे. फक्त बिल्डर किंवा रीअल इस्टेट एजंटशी ट्रॅक रेकॉर्डसह थेट व्यवहार सोयीस्कर ठरतो.

या लॉकडाऊनच्या परिस्थितीत तुम्हाला सुद्धा फ्लॅट खरेदी करण्यासाठी अनेक मेसेजस व कॉल आले असतील ते ही मोठ्या डिस्कॉउंट सोबत. तर त्या खोट्या ऑफर्सना भुलून न जाता ते किती खरं आहे याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

प्रॉपर्टीची कागदपत्रे तुमच्या नावावर झाल्याची खात्री करुन घ्या

संपत्तीचे व्यवहार पूर्णतः ऑनलाईन झाले असले तरी आपल्याकडे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी मालमत्तासंबंधित कागदपत्रांचा ताबा असणे आवश्यक आहे. जरी आपण आपले स्वप्नातील घर ऑनलाइन शोधण्यात सक्षम असाल. ऑनलाइन चॅनेलचा वापर करुन ते खरेदी करण्यास इच्छुक असाल.

घर कर्ज ऑनलाइन मंजूर केले असतील तरीही मालमत्तेची कागदपत्रे आपल्याकडे नसल्यास मालमत्तेवरील आपली मालकी सिद्ध होत नाही. म्हणूनच, कागदपत्रे योग्यरित्या आणि नोंदणीकृत झाल्याचे सुनिश्चित करा.

बर्‍याच मेट्रो शहरात मालमत्तेच्या किंमती वर्षानुवर्षे वाढत आहेत. मेट्रो शहरात मोक्याची जागा मिळणे अधिक चांगले असते. त्यासाठी  नानीज बिल्डकॉन घेऊन आले आहेत वेदांत गार्नेट एक असा प्रोजेकट त्यात तुम्हाला मिळेल  २ BHK, BHK प्लस टेरेस ऑफोर्डब्ल फ्लॅट जो बसणार तुमच्या रिअल इस्टेटच्या इनव्हेसमेंटमध्ये फायदेशीर ते ही तुमच्या आवडत्या शहरात म्हणजे आपल्या नागपूरमध्ये!  आपल्याला ही रिअल इस्टेट गुंतवणूकीकडे जाण्याची ही योग्य वेळ आहे. वैयक्तिक वापरासाठी एखाद्या सुरक्षित आणि योग्य मालमत्तेत गुंतवणूक करा.

आजच आम्हाला संपर्क करा आणि तुमच्या भविष्याची गुंतवणूक सुरक्षित करा.    

Author

Share This :

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.